दसरा चौक–संभाजीनगर रस्ता जलद पूर्ण करा – अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांचे आदेश

<p>दसरा चौक–संभाजीनगर रस्ता जलद पूर्ण करा – अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांचे आदेश</p>

कोल्हापूर : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या दसरा चौक ते संभाजीनगर रस्त्याच्या कामांची आज कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पाहणी केली. या दरम्यान त्यांनी कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त करत रस्त्यावरील खराब झालेला वरचा लेअर तो पूर्णतः खरडून घेऊन त्या ठिकाणी नवा लेअर टाकण्याचे त्यांनी आदेश दिले. काम करताना धुळीचे प्रदूषण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच कन्सल्टंटकडून वेळोवेळी डांबराचे नमुने तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

यानंतर अडसूळ यांनी परीख पूल परिसरातील प्रस्तावित काँक्रीट रस्त्याच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला लाईन आऊट देऊन तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करण्याचेही त्यांनी आदेश दिले. त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे फाटकाजवळील फुटवेअर ब्रिज (FOB) च्या कामाची पाहणी करून ब्रिजचे मार्किंग व लाईन आऊट तातडीने करून देण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या.

यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, ठेकेदार कंपनीचे मॅनेजर सत्तार मुल्ला, कन्सल्टंट अविनाश कसबेकर, उपशहर अभियंता अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, मीरा नगीमे व ठेकेदार अनिल पाटील उपस्थित होते.