१९ सप्टेंबरला शाहू स्मारक भवनमध्ये संविधान सन्मान परिषद होणार...

<p>१९ सप्टेंबरला शाहू स्मारक भवनमध्ये संविधान सन्मान परिषद होणार...</p>

कोल्हापूर - राष्ट्रीय स्तरावर लोकशाहीचा गौरव होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे व्यापक अभियान चालू आहे. या अंतर्गत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या वतीने १९ सप्टेंबरला शाहू स्मारक भवनमध्ये संविधान सन्मान परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांचे हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या परिषदेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील  आणि आ. प्रा. जयंत आसगांवकर हे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या अध्यक्ष स्थानी रुपा वायदंडे असणार आहेत. या परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, राज्य प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पोवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सागर लाखे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार बैठकीला मारुतीराव गायकवाड, आकाश भालेकर, महिपती खीलारे, बाळासाहेब चव्हान, शैलेश सोनुले आदी उपस्थित होते.