राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव बॉम्बस्फोट, डॉ.दाभोलकरांची हत्या करणारे निर्दोष सुटलेत... 

 माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची खंत 

<p>राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव बॉम्बस्फोट, डॉ.दाभोलकरांची हत्या करणारे निर्दोष सुटलेत... </p>

पुणे - मालेगाव बॉम्ब खटला आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला त्याचबरोबर 7/11 ट्रेन बॉम्ब ब्लास्ट यामधील बळींना न्याय  मिळाला नाही. या सर्व केसमध्ये गुन्हेगार आणि कट करणारे निर्दोष सुटलेत, अशी खंत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली आहे. त्या पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

या मोठ्या गुन्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही, याला राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे. पोलिसांवर जो राजकीय दबाव येतो, त्यामुळे सत्यशोधन करण्याचा रस्ता पोलिस सोडून देतात. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेस वर्षानुवर्षे चालत राहतात आणि यामुळे न्याय मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.