पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याला ‘राजगड’ हे नाव ; केंद्राची मान्यता 

<p>पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याला ‘राजगड’ हे नाव ; केंद्राची मान्यता </p>

पुणे – खूप काळापासून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या ‘राजगड’चे नाव देण्यात यावे यासाठी मागणी होत होती. या मागणीला अखेर राज्य सरकारसह केंद्राने मंजुरी दिली आहे. 
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याला विशेष महत्व आहे त्यामुळे वेल्हे तालुक्यातील सत्तर पैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायतींनी नाव बदलाच्या ठरावाला मान्यता दिली होती. तसेच पुणे जिल्हा परिषदेनेही या ठरावाला मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्याच्या महसूल विभागाने या ठरावाला मान्यता दिली आहे. तसेच राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.  महाराष्ट्र सरकार या संदर्भात लवकरच नवे राजपत्र जारी करणार आहे. त्यामुळे इथून पुढे वेल्हे तालुका राजगड या नावाने ओळखले जाणार आहे.