जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच ; पंचगंगेची पाणी पातळी ‘इतक्या’ फुटावर 

<p>जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच ; पंचगंगेची पाणी पातळी ‘इतक्या’ फुटावर </p>

कोल्हापूर – गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित सर्व दरवाजे उघडले आहे. वाढत्या पावसाच्या जोरामुळे जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  आज दुपारी तीन वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३१ फुट १ इंचावर होती. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फुट असून धोका पातळी ४३ फुट आहे.