आंबा घाटातील वाहतूक ठप्प... 

वाहनांच्या लांबच लांब रांगा

<p>आंबा घाटातील वाहतूक ठप्प... </p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीत वाढत होत आहे. या वाढत्या पावसामुळे आंबा घाटातील मातीचा मलबा हळूहळू खाली येवू लागला आहे. हा मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
हा मातीचा मलबा हटवण्याचे काम सुरु असून वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येण्याची शक्यता आहे.