चांदोलीत महिलांचा दारूबंदीचा निर्धार
तहसीलदार कार्यालयावर लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर – शाहुवाडी तालुक्यातील आंबा चांदोली ग्रामसभेच्या ठरावानुसार गावामध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही धनदांडग्यांनी परमीटरूम आणि हॉटेलच्या आड अवैध दारू व्यवसाय सुरू केला आहे. या विरोधात गावातील महिला बचत गटाने एकजूट दाखवत मोठा लढा उभारला आहे.
तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी दारूबंदीची मागणी करत स्वातंत्र्य दिनादिवशी तहसीलदार कार्यालयावर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले. “गावातील आरोग्य, सुरक्षेसाठी दारूबंदीचा ठराव आहे. तरीही जर अवैध धंदे सुरु राहिले तर व्यापक जनआंदोलन उभारले जाईल”, असा इशारा यावेळी देण्यात आला.