महाराष्ट्र पोलिस दलातील मेगा भरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी
मंत्रिमंडळात निर्णय : रास्त भाव दुकानदारांना खुशखबर...

मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पदभरतीला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यातील हजारो तरूण पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. आता या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना पोलिस होण्याची संधी मिळणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदारांना खुशखबर मिळाली आहे.