शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किरण बंगला ते सासणे मैदानापर्यंत एकेरी वाहतूक सुरु...

<p>शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किरण बंगला ते सासणे मैदानापर्यंत एकेरी वाहतूक सुरु...</p>

कोल्हापूर - शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात काही ठिकाणी एकेरी वाहतूक मार्ग पाच ऑगस्टपासून पंधरा दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू केलाय. त्यानुसार ताराबाई पार्क इथून सासणे मैदानाकडे येताना किरण बंगल्यापासून डी मार्ट कडील बाजूने सासणे मैदान मार्गे वाहने दाभोळकर कॉर्नरकडे येतील. महापालिका निवडणूक कार्यालयाकडून किरण बंगल्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आलीय. तर दाभोळकर कॉर्नरकडून जाणारी सर्व वाहने पूर्वी प्रमाणे सासणे मैदान, दामिनी हॉटेल मार्गे पुढे किरण बंगला चौकात निघतील. १९ ऑगस्टपर्यत हा मार्ग प्रायोगिक तत्वावर एकेरी सुरू राहणाराय या बदलामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी झाली आहे.