कोडोलीतील जनावरे व्यापारी संघाचे आ. विनय कोरेंना निवेदन

कोल्हापूर - ग्रामीण भागातील जनावरे खरेदी विक्री करण्याचा व्यापार व्यापारी करत असतात. मात्र काही संघटना गायींचे संरक्षण, गोहत्या बंदी कायदयाच्या नावाखाली जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची वाहन अडवून त्यांच्या वाहनांची तपासणी करत आहेत. व्यापाऱ्यांना नाहक त्रास देवून पैशाचीही मागणी करतात, असा आरोप कोडोलोतील जनावरे व्यापारी संघाने केला आहे.
या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक आणि व्यापाऱ्यांनाही मारहाण केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या संघटनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाने आमदार विनय कोरे यांना दिले आहे.