उत्तराखंडमधील दुर्घटनेत महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक अडकलेत  

  मंत्री गिरीश महाजन

<p>उत्तराखंडमधील दुर्घटनेत महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक अडकलेत  </p>

मुंबई – उत्तराखंड राज्यात   झालेल्या  ढगफुटीमध्ये  अनेक लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक अडकल्याची भीती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडसाठी रवाना झाले  आहेत. राज्यातील सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती  राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सध्या दिली आहे. 
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात ढगफुटीमुळे खीर गंगा नदीला मोठा पूर आला आहे. या दुर्घटनेत काहींचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटक या दुर्घटनेमुळे उत्तरकाशीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.