राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला उच्च दर्जाचे ५१ तंबू प्राप्त

<p>राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला उच्च दर्जाचे ५१ तंबू प्राप्त</p>

कोल्हापूर - जिल्हयामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेला एकावन्न उच्च दर्जाचे तंबू प्राप्त झाले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते हे तंबू प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपुर्द करण्यात आले.

तांत्रिक प्रशिक्षक अजित पांडे यांनी या तंबूबद्दल तांत्रिक माहिती दिली. आरोग्य विभागातील रुग्ण सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्ण सुविधा देण्यासाठी राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यक्रमांतर्गत हे तंबू उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्हयातील दुर्गम भागातील मोठ्या यात्रांवेळी, साथींच्या  रोगांचा उद्रेक झाल्यावर  तसचं संभाव्य पूरग्रस्त गांवामध्ये रुग्णसेवा देण्यासाठी या तंबूंचा उपयोग होणार आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.