शहीद जवानांच्या कुटुंबियांना घरबांधणीसाठी बांगर कंपनी देणार सिमेंट

<p>शहीद जवानांच्या कुटुंबियांना घरबांधणीसाठी बांगर कंपनी देणार सिमेंट</p>

कोल्हापूर - बांगर सिमेंट कंपनीने भारतीय सैन्य दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी मोफत सिमेंट पुरवणारी 'प्रोजेक्ट नमन' ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कंपनीने आतापर्यंत देशातील १८३ शहीद कुटुंबियांना घर बांधण्यासाठी सिमेंटच्या ८० हजारांहून अधिक बंगा दिल्या आहेत. कंपनीचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुध्दा ही योजना सुरु करण्यात आल्याचे सांगितले आहे.

गडहिंग्लजचे शहीद जवान महादेव बाळू तोरस्कार यांच्या वीरपत्नी वृषाली तोरस्कर यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. १ जानेवारी १९९९ ते २०१९ या कालावधीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ८८ ८८८५५९८१ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन बांगर सिमेंटच्यावतीने करण्यात आले आहे.