कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट 

<p>कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट </p>

कोल्हापूर – कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसांचे दर्शन घडवणारी फोटो फ्रेम आयुक्तांना देवून त्यांचे स्वागत केले.
यावेळी  कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर फर्स्ट यांनी समन्वयाने एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान चेअरमन सुरेंद जैन यांनी कोल्हापूर फर्स्टचे उद्दिष्टे सांगितले. या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ कोडोलीकर, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, सी. ए. असोसिएशन चेअरमन आशिष सेवेकरी, विशेष निमंत्रित मिलिंद आळवेकर, सतीश डकरे आदी उपस्थित होते.