गडहिंग्लजमध्ये बैलगाडी शर्यतीत... थरकाप उडवणारी घटना घडली
कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथे बैलगाडी शर्यतीवेळी जीवाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शर्यत सुरु असताना चौखूर उधळलेल्या बैलांच्या मार्गात एक मोटारसायकल आली. यावेळी प्रचंड वेगात असलेल्या बैलांना अचानक थांबता आले नाही. त्यामुळे या बैलांनी हवेत उंच उडी मारत मोटारसायकल चालकांच्या अंगावरून बैलगाडी गेली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात्रेनिमित्त बैलगाडीच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत.