पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित...तेरवाडजवळ नदीचे पाणी काळपट आणि फेसाळलेले...

<p>पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित...तेरवाडजवळ नदीचे पाणी काळपट आणि फेसाळलेले...</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील तिरवाड येथे नदीच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली असून दुसऱ्या बाजूला रासायनिक सांडपाण्यामुळे पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे नदीपात्रात दुर्गंधी पसरली असून नदीचे नैसर्गिक संतुलन बिघडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम शेतीसोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दूषित पाणी पिकांना घातक ठरत असून पिकांचे नुकसान होत आहे. या पाण्याच्या संपर्कात आल्यावर हाताला खाज, खरूज होण्याचे प्रकार वाढले आहेत. पर्यायी पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत आंदोलन अंकुश संघटनेने प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी संबंधित विभागांना प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी ५ एप्रिलनंतर नदीत दूषित पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.