खळबळजनक : ‘या’ शहरातील तब्बल 40 जणांनी इच्छा मरणासाठी दाखल केले अर्ज
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी 32 वर्षीय हरीश राणा याला इच्छामरण देण्याची परवानगी दिली . त्यानंतर आता मुंबई शहरातील तब्बल ४० जणांनी इच्छामरणसाठी परवानगी मागितली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेकडे 40 जणांचे इच्छामरणासाठी अर्ज दाखल झाले आहेत . याबाबत कोणतीही सुस्पष्टता नसल्याने या अर्जाचे पुढे काय करायचे, असा पेच महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.