इचलकरंजीत पेट्रोल पंपावर गर्दी... टंचाईच्या भीतीने वाहनधारकांच्या रांगाच रांगा...

<p>इचलकरंजीत पेट्रोल पंपावर गर्दी... टंचाईच्या भीतीने वाहनधारकांच्या रांगाच रांगा...</p>

इचलकरंजी - आखाती देशातील युद्धाचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसह आता पेट्रोलसाठी रांगा लागत आहेत. इचलकरंजी शहरात काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे ते तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. तर सुरू असलेल्या पंपांवर पेट्रोल संपण्याच्या भीतीने पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपांवरील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. पंपांवर निर्माण झालेल्या या गोंधळामुळे वाहतूक कोंडीची झाली होती.