नियम धाब्यावर... : परीख पुलाखालून तीन आणि चारचाकी वाहतूक सुरूच
कोल्हापूर – शहरातील परिख पुलाखाली रस्ता आणि ड्रेनेजच काम सुरु आहे. याठिकाणी वाहतूक कोंडी होवू नये. यासाठी शहर वाहतूक शाखेने परिख पुलाखालून दुचाकी वगळता तीन आणि चारचाकी वाहनांना आजपासून प्रवेश बंदी केली आहे. मात्र शहर वाहतूक शाखेचा हा नियम धाब्यावर बसवून आज याठिकाणाहून तीन आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. दुपारच्या वेळेस परिख पुलाखाली एक चारचाकी अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहर वाहतूक शाखेने प्रवेश बंदी केली असली तरी वाहतूक शाखेचा एकही पोलिस याठिकाणी दिसून आला नाही.