सीमा लढयातील मराठी भाषिकांचा बुलंद आवाज हरपला
कोल्हापूर - मध्यवर्ती तसेच शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक अर्जुनराव दळवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी बेळगाव जिल्ह्यातील टिळकवाडी येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चळवळीतील मराठी भाषिकांचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.