रेशन कार्डधारकांना रॉकेल उपलब्ध करून देण्याची मागणी
कोल्हापूर - स्वयंपाकासाठी लागणारे इंधन रॉकेल हे रेशन कार्डधारकांना उपलब्ध करून द्या, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकरी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आले.
मागील काही वर्षांपासून रेशन कार्डधारकांना रॉकेल बंद करण्यात आले आहे. तसेच गॅस वितरणामध्ये ४५ दिवसांचे बुकिंग करण्याची अट घातली जाण्याची शक्यता व्यक्त होतीय. या पार्श्वभुमीवर नागरिक घरातील स्वयंपाक करण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत रेशनकार्डधारकांना रॉकेल उपलब्ध करुन दिल्यास हे संकट टळू शकते. असा मुद्दा यावेळी संघटनेने उपस्थित केला आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, दीपक शिराळे, इंदुमती मिरजकर, तानाजी चव्हाण, दीपक मिरजे, साताप्पा भास्कर, दिनकर पाटील, आशिष आडवडेकर, अरूण यादव, संग्राम भास्कर, आदी उपस्थित होते.