सोशल मिडीयावर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा अजब दावा..!
मुंबई – आखाती देशात युद्ध सुरु असल्याने देशासह राज्यात इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे अवघड झाले आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या तुटवड्यामुळे अनेकांवर आपला हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. असं असताना राज्य सरकारने आपल्या अधिकृत ट्वीट अकाऊंटवरून व्यावसायिक एलपीजी पुरवठ्याबाबत अजब दावा केला आहे.
राज्य सरकारने म्हटले आहे कि,, “महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे दिशाभूल करणारे आहेत. घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. भू-राजकीय परिस्थिती आणि केंद्र सरकारचे निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.