इचलकरंजीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्केटच्या टेरेसवर 'ओपन बार'... व्यापारी त्रस्त

<p>इचलकरंजीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्केटच्या टेरेसवर 'ओपन बार'... व्यापारी त्रस्त</p>

इचलकरंजी - शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विकली मार्केट परिसरात मद्यपींचा वावर वाढला आहे. मार्केटजवळील वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून काही जण थेट मार्केटच्या टेरेसवर जाऊन बसतात. तळीराम मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असून यातून वादावादीचेही प्रकार घडत आहेत. या मद्यपींकडून मार्केटच्या गेटची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच टेरेसवरील कॉलममधील लोखंडी साहित्य चोरीला गेले आहे. मार्केटच्या टेरेसवरच सुरू असलेल्या या 'ओपन बार' मुळे परिसरातील व्यापारी आणि विक्रेते त्रस्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेवून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.