गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली – आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. देशात इंधनाची टंचाई जाणवू लागल्याने व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे काही शहरात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात एस्मा कायदा लागू केला आहे.
या कायद्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना जास्त प्रमाणात एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
ESMA (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) हा कायदा भारतीय संसदेने 1968 साली मंजूर केला होता. दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मा कायद्याच्या कार्यकक्षेत समावेश होतो. आपत्कालीन काळात आवश्यक सेवा आणि सुविधांचा विनाखंड पुरवठा सुरु राहावा, यादृष्टीने हा कायदा तयार करण्यात आला आहे.