आता ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक अन् टॅक्सी दिसणार नाहीत रस्त्यावर...
बंदीचा राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई – राज्य सरकारने ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) कंपन्यांच्या बाईक, टॅक्सी सेवांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपनीच्या बाईक आणि टॅक्सीधारकांना बेरोजगारीचा मोठा धक्का बसणार आहे.
राज्य सरकारने या कंपन्यांना देण्यात आलेले अस्थायी परवाने रद्द केले असून त्यामुळे सध्या महाराष्ट्रात या कंपन्यांची बाईक आणि टॅक्सी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कंपन्यांना राज्यात बाईक आणि टॅक्सी चालवण्याची परवानगी देताना फक्त इलेक्ट्रिक बाईक वापरण्याची अट घालण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक आणि टॅक्सी सुरू केल्याचा आरोप केला आहे. हा नियमभंग मानून सरकारने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे.