आता यापुढे नवीन ऑटो रिक्षांना परवाने मिळणार नाही : मंत्री प्रताप सरनाईक

<p>आता यापुढे नवीन ऑटो रिक्षांना परवाने मिळणार नाही : मंत्री प्रताप सरनाईक</p>

मुंबई - वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेवून राज्य सरकारने आजपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्यास स्थगिती दिली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्रिमंडळासोबत चर्चा करून स्पष्ट धोरण (एसओपी) तयार केल्यानंतरच पुढे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.  
राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली  आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये रिक्षांचा सुळसुळाट झाल्याने वाहतुकीवर मोठा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे.