आसाममध्ये विमान अपघात... दोन्ही वैमानिकांना वीरमरण
दिसपुर – आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले आहे. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट महाराष्ट्राचे सुपूत्र पूर्वेश दुरगकर या दोन्ही वैमानिकांना वीरमरण आले आहे.
आज (6 मार्च) पहाटे हवाई दलाने एसयू-30 एमकेआय अपघाताची पुष्टी केली आहे. हवाई दलाकडून दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दरम्यान, एसयू-30 एमकेआयची शोध मोहीम सुरू आहे. अपघात झाला तेव्हा लढाऊ विमान नियमित उड्डाण किंवा मोहिमेवर होते. या दरम्यान, त्याचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रडारशी संपर्क तुटल्यानंतर, हवाई दलाने तत्काळ अलर्ट जारी केला आणि घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएफ टीम आसामला पाठवली आहे. विमानाचे नेमके स्थान आणि संपर्क तुटण्याचे कारण सध्या शोधले जात आहे.