२०२४ पेक्षा २०२५ मध्ये बेपत्ता महिलांची संख्या वाढली...: विधानपरिषदेत मंत्र्यांची माहिती  

<p>२०२४ पेक्षा २०२५ मध्ये बेपत्ता महिलांची संख्या वाढली...: विधानपरिषदेत मंत्र्यांची माहिती  </p>

मुंबई – आजच्या विधानपरिषदेमध्ये राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी राज्यातील बेपत्ता महिला आणि हरवलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या सांगितली. त्यामध्ये २०२४ सालापेक्षा २०२५ या सालात बेपत्ता महिलांची संख्या दोन हजारांनी वाढली आहे. यावर  काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारला जाब विचारत मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह  उपस्थित केला.

2024 साली बेपत्ता महिलांचा  हा आकडा 45 हजार 662 इतका होता त्यापैकी ३० हजार ८७७ इतक्या महिला सापडल्या आहेत हा आकडा 2025 मध्ये वाढून 48 हजार 278 वर पोहचला होता. त्यापैकी ३६ हजार ५८१ इतक्या महिला सापडल्याची माहिती सभागृहात राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली. 
हरवलेल्या अल्पवयीन मुलींमध्ये 2024 मध्ये 11 हजार 316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी ८ हजार ४७५ सापडल्या आहेत, तर 2005 मध्ये ही संख्या 12 हजार 113 इतकी होती. त्यापैकी १० हजार २९५ मुली सापडल्याची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. 
यावर आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी,  शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मुली गायब होत आहेत. साधारण 12 हजार महिला बेपत्ता असून त्यात 2 हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. राज्याच्या यंत्रणा राबवूनही जर इतक्या मोठ्या प्रमाणात लेकी-बाळी बेपत्ता होत असतील, तर ही बाब राज्यासाठी भूषणावह नाही. हा मुलींच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.