अग्निवीर भरतीसाठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू...

<p>अग्निवीर भरतीसाठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू...</p>

कोल्हापूर - अग्निवीर जनरल ड्युटीसाठी भारतीय सैन्य भरतीची ऑनलाईन नोंदणी १३ फेब्रुवारी ते १ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू झाली आहे. अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (८ वी) व अग्निवीर ट्रेड्समन (१० वी) या पदांसाठी अर्ज Indian Army च्या अधिकृत संकेतस्थळावर www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध आहे.

ही नोंदणी महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा येथील उमेदवारांसाठी लागू आहे. नोंदणी प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी Join Indian Army या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांनी कोणत्याही दलालांना बळी पडू नये, कारण भरती प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कोल्हापूर येथील आर्मी रिक्रूटिंग ऑफिसशी दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६०६४१९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.