आता ‘शिवशाही’ बस रस्त्यावर धावताना दिसणार नाही... 

राज्य शासनाचा निर्णय 

<p>आता ‘शिवशाही’ बस रस्त्यावर धावताना दिसणार नाही... </p>

मुंबई – प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी  'शिवशाही' बस आता साध्या अवतारात प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. सततचे बिघाड आणि प्रवाशांचा घटता प्रतिसाद पाहून  महामंडळाच्या 453 शिवशाही बसेसचं आता निमआराम आणि साध्या बसेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या एकूण ६८८ शिवशाही बसेस आहेत. त्यापैकी ४५३ बसेस सध्या सुस्थितीत असून धावत आहेत. मात्र, या गाड्यांचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त नाही. तसेच शिवशाही बसेसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांनीही पाठ फिरवली आहे. हे शासनानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता शिवशाही बस साध्या बसेसमध्ये रस्त्यावर धावताना दिसणार आहे.