OTT प्लॅटफॉर्म्सवर केंद्राचा कारवाईचा बडगा...

 पाच OTT प्लॅटफॉर्म्स केले ब्लॉक

<p>OTT प्लॅटफॉर्म्सवर केंद्राचा कारवाईचा बडगा...</p>

नवी दिल्ली – मनोरंजनाच्या नावाखाली सुरु असलेल्या अश्लील अ‍ॅप्स/वेबसाईट्सवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
यावेळी  पाच OTT प्लॅटफॉर्म्सला पूर्णपणे ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या प्लॅटफॉर्म्सवर थेट नग्नता आणि लैंगिक दृश्यांवर आधारित मजकूर प्रसारित केला जात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu या अ‍ॅप्स/वेबसाइट्सवर लैंगिक संबंध दाखवणारे सीन आणि फक्त उत्तेजक कंटेंटचाच भडिमार सुरू होता. यात भारतीय कायद्यांचे उल्लंघन होत असल्याने हे प्लॅटफॉर्म्स तात्काळ बंद करण्याचे  आदेश देण्यात आले  आहेत .