मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर 32 तास अडकलेल्या 1.2 लाख प्रवाशांना मिळणार पैसे...  

<p>मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर 32 तास अडकलेल्या 1.2 लाख प्रवाशांना मिळणार पैसे...  </p>

मुंबई - 3 फेब्रुवारी रोजी मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर 32 तासांपेक्षा अधिक वेळ अडकलेल्या प्रवाशांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 
यावेळी प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अशा तब्बल 1.2 लाख प्रवाशांना सुमारे 5.16 कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. येत्या काही दिवसांत संबंधित वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये हे पैसे थेट जमा केले जाणार आहे.
मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र तोपर्यंत काही वाहनधारकांच्या FASTag खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. याच व्यवहारांची माहिती तपासून आता ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदेश दिल्यानंतरही ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्या सर्वांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.