पारगावात शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन...
कोल्हापूर - शिवजयंतीनिमित्त हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे फ्रेंड्स पॉवर वाघाची तालमीच्यावतीने आणि पेठवडगाव मधील शिवकालीन युद्ध, कला प्रशिक्षण ऐतिहासिक संग्रहालयाच्या सहकार्याने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात शिवकालीन तलवारी, भाले, ढाली, शिवकालीन नाणी, बाण, चिलखत, खंजीर, चिलम, मराठा धोपतलवार, जुने अडकित्ते, सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी वापरलेली तलवार, साधारपणे ६०० वर्ष जुन्या कट्यारी, दख्खनी तेगा, राज्यशस्त्र दांडपट्टा, ब्रिटिश कालीन बंदूका आणि विविध पारंपरिक शस्त्रांचे दर्शन यातून होते आहे. तरुण पिढीला शिवकालीन इतिहासाची आणि शौर्य परंपरेची ओळख करून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेआहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.