शिवजयंतीनिमित्त पन्हाळा गडावर 'मेगा पदयात्रेचे' आयोजन
कोल्हापूर – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त येत्या गुरुवारी पन्हाळा गडावर मेगा पदयात्रेचे आयोजित करण्यात आले आहे.
ही 'मेगा पदयात्रा' सकाळी ८.३० वाजता पन्हाळा नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापासून सुरू होवून मयुर बागेपर्यंत काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच १८ आणि १९ फेब्रुवारी या दोन दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या मेगा पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.