इचलकरंजीत घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन...

जागोजागी साचले कचऱ्याचे ढीग...

<p>इचलकरंजीत घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन...</p>

इचलकरंजी - महानगरपालिकेकडील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना मक्तेदाराने वेतन, महागाई भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी आली नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार होत नाही, अशी तक्रार वारंवार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता महापालिकेचे नूतन महापौर, उपमहापौर आणि नवनिर्वाचित सदस्यांनी तरी ही समस्या सोडवावी, अशी अपेक्षा इचलकरंजीवासिय व्यक्त करत आहेत.