आता एसटीचा प्रवास होणार स्मार्ट...सवलतधारकांसाठी 'NCMC' स्मार्ट कार्ड अनिवार्यता : मंत्री प्रताप सरनाईक 

<p>आता एसटीचा प्रवास होणार स्मार्ट...सवलतधारकांसाठी 'NCMC' स्मार्ट कार्ड अनिवार्यता : मंत्री प्रताप सरनाईक </p>

मुंबई - एसटी प्रवाशांना रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उ‌द्देशाने एसटी महामंडळाने 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने में. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बैंक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. या कार्डचा वापर शालेय विद्यार्थी पासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांना करता येणार आहे.