शिंगणापूरमधील स्मृतिभ्रंशाचा आजार असलेल्या ७५ वर्षीय आजी झाल्या बेपत्ता...
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील गणेश नगर मधल्या सुलोचना देशमाने या ७५ वर्षीय आजी आठ फेब्रुवारीच्या सकाळी सातपासून बेपत्ता आहेत. करवीर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. आजींना स्मृतिभ्रंश आजार असल्याने त्यांना काहीही आठवत नाही किंवा कोणतीही माहिती सांगता येत नाही. त्यामुळे त्या गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. जर कुणाला त्या आढळून आल्या किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर संबंधितांनी ९३२५२८६२६३, ९१५६७३२६२३, ७२४८९७८३१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.