‘एआय’ च्या कंटेंटवर आता केंद्र सरकारचं नियंत्रण... 

देशात २० फेब्रुवारीपासून कडक नियम लागू

<p>‘एआय’ च्या कंटेंटवर आता केंद्र सरकारचं नियंत्रण... </p>

नवी दिली – भारतात ‘एआय’चा वापर खूप वाढत चालला आहे. या वाढत्या वापराचा हळूहळू गैरवापर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ‘एआय’ च्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने आयटी नियम २०२१ मध्ये नवीन सुधारणा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार २० फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फेक कंटेंट तीन तासांत हटवावा लागणार आहे. तसेच एआय कंटेंटचे लेबलिंग अनिवार्य करण्यात आले आहे.