केंद्र सरकारच्या नवीन श्रम संहितां विरोधात कामगार संघटनांचा १२ फेब्रुवारीला संप...

<p>केंद्र सरकारच्या नवीन श्रम संहितां विरोधात कामगार संघटनांचा १२ फेब्रुवारीला संप...</p>

कोल्हापूर -  केंद्र सरकारने कामगारांसाठी नवीन श्रम संहिता  आणलीय. या श्रमसंहितांना कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीसह अनेक कामगार संघटनांनी विरोध केला आहे. या श्रम संहितांमुळे कामगारांच्या हक्कांचे संरक्षण होण्याऐवजी मालकांना अधिक अधिकार मिळत असल्याने कामगारांची गुलामासारखी अवस्था झाल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी या श्रम संहितांविरोधात गुरुवारी १२ फेबुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने कॉम्रेड अतुल दिघे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे.

या संपात १० केंद्रीय कामगार संघटना आणि अनेक फेडरेशन सहभागी होणार आहेत. संप काळात कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनंत कुलकर्णी, सुवर्णा तळेकर, प्रकाश जाधव, नारायण मिरजकर उपस्थित होते.