छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलजवळ कोसळलं भलं मोठं झाड...
कोल्हापूर – काही वेळापूर्वी सीपीआर जवळ खूप वर्षा पूर्वीचं भलं मोठं झाड कोसळले आहे. अचानक पडलेल्या या झाडामुळे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल, सर्किट बेंचमधील तसेच आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे झाड मुळापासून उपसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कोणाची जीवितहाणी झालेली नाही परंतु या कोसळलेल्या झाडामुळे दोन गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हा रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून झाड हटवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.