गेल्या १७ तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने गेल्या १७ तासांपासून अधिक काळ झाला महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती. सध्या वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तरीही वाहतूक कोंडी सुटलेली नाही या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेत मुंबई-पुणेकडे येणाऱ्या- जाणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत.