रशियाला भूकंपाचा धक्का...
नवी दिल्ली – आज सकाळी रशियाला भूकंपाचा धक्का बसला आहे. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. त्यानंतर, त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणने या भूकंपाची तीव्रता ७.४ आणि खोली ३९.५ किलोमीटर नोंदवली आहे. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने हा भूकंप त्सुनामीच्या लाटा निर्माण करू शकतो, असा इशारा दिला आहे.