आखाती देशांतील युद्धाचा एअर इंडियाच्या उड्डाणावर परिणाम...

२ हजार ५०० उड्डाणे रद्द

<p>आखाती देशांतील युद्धाचा एअर इंडियाच्या उड्डाणावर परिणाम...</p>

नवी दिल्ली – गेल्या २३ दिवसांपासून सुरु असलेल्या आखाती देशातील युद्धामुळे इंधनासह अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला आहे. आता या युद्धाचा परिणाम एअर इंडियाच्या उड्डाणावरही झाला आहे.  
एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी दिली आहे.
हवाई क्षेत्र आणि विमानतळ बंद असल्याने किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडियाला आपली ७० टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली आहेत.