पाकिस्तान – अफगाणिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला...
 

पाकिस्तानने अफगाणिस्तावर केला हल्ला.. चार जण ठार तर १५ जण जखमी...

<p>पाकिस्तान – अफगाणिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला...<br />
 </p>

नवी दिल्ली – काल रात्री पाकिस्तानने अफगाणिस्ताची राजधानी काबूलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात  चार जण ठार झाले आहेत तर  १५ जण जखमी झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. 
तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने कंदाहार विमानतळाजवळील खासगी विमान कंपनीच्या तेल साठ्यावर बॉम्ब हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली नसली तरी संरक्षण विभागाशी निगडीत सूत्रांनी या हल्ल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेला दिली आहे. 
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांना आसरा दिल्याचा आरोप अफगाणिस्तानवर केला जातो. पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांसाठी यांनाच जबाबदार धरण्यात आले होते. अफगाणिस्तानकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसऱ्या देशावर हल्ले करण्यासाठी केला जात नाही, अशी भूमिका तालिबान सरकारने मांडली आहे.