इराणने भारतीय ध्वज असलेल्या टँकरांना सुरक्षितपणे जाण्यास दिली परवानगी
नवी दिल्ली – इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून तेलाच्या जहाजांना जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेक देशात तेलाचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आता इराणने भारतीय ध्वज असलेल्या टँकरांना सुरक्षितपणे जाण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय जहाजांचा धोका टळला असून जागतिक तेल पुरवठ्यात भारताची भूमिका आता मजबूत झाली आहे. त्यामुळे देशातील इंधनाचा तुटवडा आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या निर्णयानंतर 'पुष्पक' आणि 'परिमल' नावाच्या दोन भारतीय टँकरांनी होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास केला आहे. हे जहाज तेल वाहतूक करतात. इतर देशांच्या जहाजांवर हल्ले होत असताना हे जहाज सुरक्षित राहिले आहे. यामुळे भारतीय जहाज कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून वाहतूक अबाधित राहिली आहे. या निर्णयामुळे भारताला तेल पुरवठ्यात अडचण येणार नाही.