युध्दामुळे ‘या’ देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती...
नवी दिल्ली – आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाची झळ अनेक देशांना बसू लागली आहे. देशांमध्ये इंधन तुटवडासह अनेक गोष्टीची टंचाई जाणवू लागली आहे. वाढत्या तुटवड्यामुळे पाकिस्तानात तर लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानने सरकारी इंधन भत्त्यांमध्ये 50 टक्क्याची कपात केली आहे. तसेच सरकारी कार्यालये आठवड्यात 4 दिवस सुरु राहणार असून कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर दोन आठवड्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.