‘या’ देशात विषारी पाऊस पडण्याची भीती...

आकाशात पसरले काळ्या धुराचे लोट

<p>‘या’ देशात विषारी पाऊस पडण्याची भीती...</p>

नवी दिल्ली – सध्या इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामध्ये  इस्रायलने इराणच्या तेहरान आणि अल्बोर्झमधील तेल डेपो आणि रिफायनरीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे 
इराणमधील शहरात विषारी धूर पसरला आहे. तसेच अनेक तेल साठवणूक केंद्रांना लागलेल्या आगीमुळे आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले असून, हवेत विषारी कण पसरायला सुरुवात झाली आहे. 
हवेत विषारी पदार्थ सोडल्यामुळे तेहरानमध्ये आम्ल पावसाचा इशारा इराणी रेड क्रेसेंटने दिला आहे. त्यात म्हटले आहे की, या स्फोटांमुळे हवेत "मोठ्या प्रमाणात विषारी हायड्रोकार्बन संयुगे, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड" सोडले गेले आहे. जर विषारी पाऊस पडला तर रहिवाशांना त्वचेच्या जळजळीचा आणि फुफ्फुसांची समस्या जाणवू लागणार आहे. पर्यावरण अधिकाऱ्यांनी लोकांना श्वसनाच्या समस्या आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यासाठी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.