इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे पाकिस्तानातील शिया समुदाय आक्रमक

<p>इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूमुळे पाकिस्तानातील शिया समुदाय आक्रमक</p>

नवी दिल्ली - अमेरिका - इराणच्या युद्धात  इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायलने केला आहे. याचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. 
खामेनी यांच्या मृत्यूमुळे पाकिस्तानातील शिया समुदाय आक्रमक झाला आहे. पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन दूतावासावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाच्या काचा फोडत इमारतीला आग लावण्यात आली आहे. यामध्ये  ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिले आहे.