जागतिक तेलाचे दर गगनाला भिडणार...
भारताच्या तेल आयातीवर होणार परिणाम...
नवी दिल्ली – सध्या अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होवू लागला आहे. या युद्धामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे जागतिक तेलाचे दर गगनाला भिडणार आहेत. तसेच पुरवठा साखळीही विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जगातील व्यापाराच्या सुमारे 20 टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीद्वारे केले जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भारताच्या एकूण मासिक तेल आयातीपैकी सुमारे 50 टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आले होते नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या सामुद्रधुनीतून भारतात 40 टक्के तेल आयात झाले होते. त्यामुळे या युद्धाची झळ भारतालाही भोगावी लागणार आहे.