परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता, संयम राखावा : मुख्यमंत्र्यांकडून सूचना जारी 

<p>परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता, संयम राखावा : मुख्यमंत्र्यांकडून सूचना जारी </p>

मुंबई – सध्या इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामध्ये देशासह राज्यातील काही विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची सूचना जारी केली आहे. यामध्ये त्यांनी परदेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी दूरध्वनी क्रमांक, वेबसाईड आणि ईमेल प्रसिद्ध केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि, मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.
 या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क रहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्यावतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील
 रामल्लाह (पॅलेस्टाईन)
 फोन : +970592916418
 ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)
 फोन : 00974-55647502 
ईमेल : cons.doha@mea.gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
 फोन : 00-966-11-4884697 
WhatsApp : 00-966-542126748 टोल फ्री : 800 247 1234
 ईमेल : cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)
 फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
 ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण) 
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
 टोल फ्री : 800-46342 
WhatsApp : +971543090571 
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत
 फोन : +96565501946
 ईमेल : community.kuwait@mea.gov.in

बाहरीन 
फोन : 00973-39418071

मस्कत 
टोल फ्री : 80071234 WhatsApp : +96898282270 
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन 
फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक) 
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 
वेबसाइट :https://eoibaghdad.gov.in 
ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in